Share

‘..तर भाजपने आपल्या १०५ आमदारांचे राजीनामे द्यावेत आणि निवडणूक लढवून दाखवावी’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल पुण्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. हिंमत असेल तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपशी दोन हात करा, असे आव्हान त्यांनी काल भाषणात केले होते. दरम्यान यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हिंमत असेल तर भाजपने आपल्या १०५ आमदारांचे राजीनामे द्यावेत आणि निवडणूक लढवून दाखवावी असे प्रतिआव्हान दिले आहे.

आमच्या सरकारविषयी, शिवसेनेबद्दल, हिंदूत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करून राज्यातील जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न राज्यातील भाजप नेत्यांकडून मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. भाजपचे केंद्रीय नेतेदेखील वैफल्यातून त्यांचीच री ओढत आहेत. सत्ता वाटपाबाबत शिवसेना खोटं बोलत असल्याचे अमित शाह यांनी म्हटले होते. यावरच मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शाह यांच्या उपस्थितीत ५०-५० टक्के सत्ता वाटप ठरले होते. पुणे ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. या ठिकाणी त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला होता. त्यामुळे अमित शाह यांनी निदान पुण्यात तरी खोटं बोलू नये असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडला नाही आणि सोडणारही नाही. फक्त सत्तेसाठी आमच्यासारख्या प्रखर हिंदुत्ववादी पक्षाला दूर करताना आणि सत्तेचा वाटा जास्त मिळावा यासाठी २०१४ साली शिवसेनेला दूर करा असे राज्यातला भाजपाच्या नेत्यांना खासगीत सांगणारे कोण होते हे अमित शाह यांनी स्पष्ट करावे असे आवाहन संजय राऊत यांनी अमित शहा यांना दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!