Share

“सहकाराबाबत आम्हाला कुणी सल्ला देऊ नका”, अमित शहांचा शरद पवारांना टोला

Published On: 

अहमदनगर : सहकार क्षेत्र अडचणीत आले आहे, अशी बोंब ठोकणाऱ्यांनीच महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने विकत घेत त्याचे खासगीकरण केले. त्यामुळे सहकाराच्या बाबतीत आम्हाला कुणी उगाच सल्ले देऊ नका, असा टोला नाव न घेता केंद्रीय गृह तथ सहकार मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे आयोजित सहकार परिषद व शेतकरी मेळाव्यात अमित शहा बोलत होते.

अमित शहा पुढे म्हणाले, सहकार क्षेत्रातील या अपप्रवृत्तींना लगाम लावण्यासाठीच केंद्र सरकारने ७५ वर्षांनंतर सहकार मंत्रालय काढले आहे. सहकारी साखर कारखानदारीसह जिल्हा सहकारी बँकांच्या डबघाईला या सहकारी संस्थांमध्ये वाढलेली बजबजपुरीच कारणीभूत असल्याचा आरोप शहा यांनी केला. या सहकारी बँका वाचविण्यासाठी कुठलीही समिती न नेमता त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची थेट मदत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्राचा सहकारात हस्तक्षेप अशी बोंब ठोकायची आणि दुसरीकडे हजारो शेतकऱ्यांच्या मालकीचे सहकारी साखर कारखाने नातेवाईकांमार्फत विकत घ्यायचे, त्यांचे खासगीकरण करायचे. सहकाराला लागलेली ही मोठी कीड आहे. हे गैरप्रकार रोखण्यासाठीच केंद्र सरकारने सहकार मंत्रालय काढले आहे. पद्माश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटलांनी काढलेला सहकारी साखर कारखाना आजही सहकार पद्धतीने सुरू आहे. याचा मला आनंद वाटतो कारण अनेक सहकारी साखर कारखाने खासगी झाले आहेत. कमीत कमी एक साखर कारखाना जपून ठेवत तो आज व्यवस्थितपणे चालू आहे याचा आनंद आहे.

देशातील साखर कारखान्यांचे प्रश्न पंतप्रधानांनी सोडविले आहेत. आज सहकारी साखर कारखानदारीसह जिल्हा सहकारी बँकाची परिस्थिती पाहिली तर, या सहकारी संस्थांमध्ये वाढलेली पुढाऱ्यांची बुजबुज कारणीभूत असल्याचा थेट आरोप शहा यांनी केला. या सहकारी बँका वाचविण्यासाठी कुठलीही समिती न नेमता त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची थेट मदत घेण्यात येणार आहे. सहकाराचे लवकरच विद्यापीठ तयार करण्यात येणार असून देशातील सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्याचे काम चालू आहे. त्यावर सचिवांची समिती काम करीत आहे. सहकार चळवळीला संकटातून बाहेर काढून ती मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार काम करीत असल्याचेही शहा म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!