🕒 1 min read
जालना : दोन महिन्यांपासून पठ्ठ्या कुठंय? विना मुख्यमंत्र्याचं कुठे राज्य चालत असतं का? मुख्यमंत्र्याच्या गैरहजेरीत शिवसेनेच्या एका मंत्र्याला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली असती तर हे राज्यं चालल नसतं का? असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ते बदनापूर येथे नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते.
पुढे रावसाहेब दानवे म्हणाले, ”हे काय म्हणतात, आमचं कुटुंब आमची जबाबदारी. मुख्यमंत्री परभणीला आले त्यांना हॉटेलवाले भेटले. त्यांनी सांगितले कर्ज काढून हॉटेल बांधले. बॅंकवाले कर्जासाठी चकरा मारत आहेत. आम्हाला पॅकेज द्या. मोदींनी जसं पॅकेज दिलं तसं राज्यातही आम्हाला पॅकेज द्या आणि मुख्यमंत्री म्हणतात आपलं कुटुंब आपली जबाबदारी.
हा मुख्यमंत्री कुटुंबाचा जबाबदार आहे की राज्यातल्या १२ कोटी लोकांचा जबाबदार आहे, हे मला तुम्ही सांगा. असा मुख्यमंत्री आपल्याला लाभला. आता तर दोन महिन्यांपासून कुठे आहे पठ्ठ्या हे काहीच सांगू शकत नाही कुणी,” असा टोला रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
यावेळी प्रचार सभेत बोलताना रावसाहेब दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. करोना काळात केंद्राप्रमाणे राज्यानेही पॅकेज जाहीर करायला हवं होतं. पंतप्रधान मोदी यांनी करोना काळात अन्नधान्याचा साठा किती आहे, याची विचारणा केली होती. देशात दोन-तीन वर्ष पुरेल एवढा साठा असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी करोना काळात मोफत अन्न धान्य द्यावं, अशी सूचना केली आहे. करोना संकट कायम असेपर्यंत ही योजना सुरू ठेवावी, असेही मोदी म्हणाले होते, असे दानवे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपावाल्यांनो, बंगळुरूचे राजभवन गाठा, बोम्मईंचे सरकार आता घालवाच!’
- ”जयंतराव, हा शहाणपणा राजू नवघरे आणि नवाब मलिकांना सांगा”
- शिवरायांचा अपमान ही किरकोळ किंवा छोटी घटना असेल तर मोठे काय? शिवसेनेचा सवाल
- ”गेंड्याच्या कातडीचं हे सरकार आहे, यांच्यात संवेदना उरलेल्या नाहीत”
- द्रविड गुरुजींनी घेतली कर्णधार विराट कोहलीची शाळा : पहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
