Share

सहकार क्षेत्र खासगी लोकांच्या घशात घालण्याचे षडयंत्र चाललेले आहे-देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : जिल्ह्यातील प्रवरानगर येथे सहकार परिषद व शेतकरी मेळाव्याचे आयोजन शनिवारी केले होते. यावेळी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी भाषण केले. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात आमचे सरकार आले तेव्हा लोक म्हणायचे, की यांना सहकारामधले काय कळते. आता सहकाराचे काय होणार, पण आमच्या सरकारने घेतलेले निर्णय सहकाराला अडचणीतून बाहेर काढणारे ठरले. अनेक लोक सहकार चळवळ धोक्यात आहे, असे सांगतात पण असे लोकच खासगी कारखाने काढून बसले आहेत.

सहकारातील कारखाने त्यांनी खासगीत नेले. हे कारखाने त्यांनी कवडीमोल भावाने विकत घेतले. त्या कारखान्यांच्या जमिनींच्या व्यवहारातही पुन्हा घोटाळे झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मालकीचे हे सहकार क्षेत्र खासगी लोकांच्या घशात घालण्याचे षडयंत्र चाललेले आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

सहकार अडचणीत आहे याबाबत मी सहमत आहे. सहकाराला मदत करण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालय निर्माण केले आहे. सहकारावर अन्याय होणार नाही त्यासाठी पारदर्शी भूमिका घेऊन मदत करण्यात येणार आहे. १०० वर्षं सहकार क्षेत्र टिकविण्यासाठी बदल करावे लागतील. असे अमित शहा म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!