Share

‘देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाच व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज’

Published On: 

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटिपेक्षा आताची दुसरी लाट भयानक आहे. परंतु यामध्ये न घाबरता कसे बाहेर पडू यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीला महाराष्ट्र ज्या पद्धतीने सामोरे जात आहे त्याच कौतुक सर्वोच्च न्यायालय व देशाच्या पंतप्रधानांनी स्वतः केले परंतु या कौतुकाच व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची आवश्यकता आहे. सरकार पातळीवर घेतलेल योग्य निर्णय आणि निर्णयाला जनतेची साथ यामुळे परिस्थिती आटोक्यात आली आहे. याच क्रमात पुण्यात सुरू केलेले हे कोव्हीड केअर सेंटर लोकांना योग्य सेवा पुरवेल असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

पुण्यातील कोरोना हद्दपार करण्यामध्ये पुणे शहर शिवसेनेचा खारीचा वाटा असावा व सर्वसामान्य रूग्णांना सर्व उपचार उपलब्ध व्हावे या उद्देशाने कात्रज परिसरात कै. ताराबाई हनुमंत थोरवे लाईफ केअर हाॅस्पिटलच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी खासदार संजय राऊत, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे, रविंद्र मिर्लेकर, बाळा कदम, डॉ. रवींद्र शिसवे (पुणे पोलीस सहआयुक्त), रवींद्र आगरवाल (सामाजिक कार्यकर्ते) आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थांबवण्यासाठी ५० ऑक्सिजन बेड, ७० आयसोलेशन बेड, १ व्हेंटिलेटर असे सुसज्ज असलेले ४ मजली कोविड केअर सेंटर मध्ये सर्व प्रकारची योग्यती उपचार सेवा उपलब्ध आहे. या सर्व सेंटरची संकल्पना व निर्मिती शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे, ऍड संभाजी थोरवे (शहर समन्वयक) व कल्पना थोरवे (संपर्क संघटिका), हरिश अगरवाल यांनी स्वखर्चाने केली आहे.

कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, समोर येणारी परिस्थिती रोखण्यासाठी आपल्याला मेडिकल रिस्पॉन्स, सोशल रिस्पॉन्स, कॉर्पोरेट रिस्पॉन्स स्वतः घेणे महत्त्वाचे आहे. राज्यात जनतेसाठी दिवस-रात्र जी सेवा सर्वांच्या मार्फत चालू आहे ती जेवढी करू तेवढी कमीच आहे, चोवीस तास देखील कमी पडत आहे, हा काळ आपल्याला कधीही विसरता येणार नाही. याप्रसंगी त्यांनी पुण्यातील शिवसैनिक व त्यांच्या कामाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!