हिंगोली : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ बुधवारी रद्दबातल ठरवला. ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी कोणतीही असामान्य परिस्थिती दिसत नसल्याने हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. यामुळे मराठा समाजाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
तर, राज्यातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. आता मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी लोकसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्याची नितांत आवश्यकता आहे. त्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शिवसेना नेते व हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे.
‘मराठा आरक्षणाला सर्वच पक्ष अनुकूल आहेत. तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने आरक्षण लागू झाले, त्याच धर्तीवर राज्यातही आरक्षण लागू व्हावे. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेत सर्व सदस्यांनी एकमताने ठराव पारित केले आहेत. त्यामुळे लोकसभेत या विषयावर स्वतंत्र अधिवेशन बोलवण्याची आवश्यकता आहे,’ असं भाष्य हेमंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलं आहे.
गरज पडल्यास मराठा आरक्षणासाठी एकदिवसीय अधिवेशन बोलावणार – अजित पवार
‘मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा धक्कादायक आहे. राज्य सरकारसह इतर संघटनांनी देखील सर्वतोपरी प्रयत्न केला. मराठा वर्गाला इतर समाजावर अन्याय न होता आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. यासाठी वेळ आल्यास पुढील अधिवेशनात किंवा गरज असल्यास संसदेचं एकदिवसीय अधिवेशन बोलवून ठराव केला जाईल. जसं भारत सरकारने ३७० कलम हटवलं तसंच पार्लमेंट ला कायद्यात बदल करण्याचा अधिकार असल्याने मराठा आरक्षणासाठी आम्ही राज्यातून एकमताने शिफारस करू,’ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- अवघ्या ‘दिडशे रुपया’त पार पडलं ‘या’ अभिनेत्याचं लग्न
- लोकांना भेटायला मी काय सरपंच आहे का ?, शिवसेना खासदाराचे बेताल वक्तव्य !
- ‘गडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती, तर ही वेळ आलीच नसती’
- ‘बंगाल जिंकण्याच्या आग्रहामुळे देश उद्ध्वस्त’, ममतांचा मोदींवर हल्लाबोल
- पंढरपूरचं मैदान मारल्यानंतर आवताडे, परिचारक फडणवीसांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

