Share

पुणेकरांना मोठा दिलासा : रुग्णसंख्येत मोठी घट तर कोरोनामुक्तांच्या आकड्यात वाढ !

Published On: 

पुणे : गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कोरोना बाधितांची नोंद पुणे शहरात करण्यात येत होती. दरम्यान, शहरातील कडक निर्बंधांचा काहीसा परिणाम आता दिसू लागला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात नव्याने २ हजार २५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, ४ हजार ८२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे शहरातील ऍक्टिव्ह रुग्णांच्या आकड्यात मोठी घट होत आहे.

पुणे शहरात १० मे रोजी ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी उपलब्ध दुसरा डोस !

४५ वर्षांपुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण होत नसल्याने वृद्धांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उद्या म्हणजेच सोमवार १० मे रोजी ४५ वर्षांपुढील नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण केल्या जाणाऱ्या केंद्राची यादी जाहीर केली आहे. १११ केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. यात १०१ केंद्रांवर कोविशील्ड तर १० केंद्रांवर कोवॅक्सिन उपलब्ध असेल, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

लसीकरण केंद्रांची यादी बघण्यासाठी –

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!