Share

फायर सेफ्टी यंत्रणा आहे मात्र हाताळण्याचे कौशल्य नाही, खाजगी रुग्णालयांची प्रशिक्षणाकडे पाठ!

Published On: 

औरंगाबाद : महापालिकेने विरार येथील कोविड हॉस्पिटलमधील आगीच्या घटनेनंतर शहरातील ७० रुग्णालयांतील फायर सेफ्टी यंत्रणेची तपासणी केली. यात अनेक ठिकाणी यंत्रणा असूनही ती चालवण्याचे कर्मचार्‍यांना प्रशिक्षण नसल्याचे समोर आले. त्यामुळे अग्निशमन विभागाकडे अर्ज करा, तुमच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाईल, अशी सूचना पालिकेने केली होती. मात्र आठ दिवस उलटल्यानंतरही एकाही हॉस्पिटलने पालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क केलेला नाही.

नाशिक व विरार येथील रुग्णालयांमधील आगीच्या घटनेनंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील सर्व कोविड रूग्णालयांची आणि कोविड केअर सेंटरची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. खबरदारी म्हणून राज्य सरकारच्या निर्देशानुसार औरंगाबाद पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील सर्व रुग्णालयांची तपासणी (ऑडिट) करण्यासाठी एक स्वतंत्र पथक नेमले.

हे पथक रुग्णालयांतील ऑक्सिजन गळती व आगीचे प्रकार रोखण्यासाठी यंत्रणा सक्षम आहे का, याची तपासणी करत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५६ रुग्णालयांची तपासणी करण्याचे ठरले होते. २६ एप्रिलपासून सुरू केलेल्या या तपासणीत मागील सहा दिवसांत ७० रुग्णालयांची तपासणी झाली आहे.

यावेळी काही रुग्णालयांमध्ये अग्निशमची सुसज्ज यंत्रणा आढळली. मात्र आग लागल्यानंतर ही यंत्रणा चालवायची कशी? याची माहिती कर्मचार्‍यांना नव्हती. त्यामुळे ज्याठिकाणी अडचणी आहेत, त्या हॉस्पिटलला नोटिसा देण्याचा निर्णय अग्निशमन विभागाने घेतला. अनेकांना तातडीने अर्ज करा, तुमच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षित केले जाईल, अशा तोंडी सूचना केला. मात्र एकाही हॉस्पिटलने आठ दिवसांत आजवर अग्निशमन विभागाकडे प्रशिक्षणासाठी संपर्क केला नसल्याचे समोर आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!