Share

पालिकेला आली जाग, विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर ‘गॅसदाहिनी’ उभारणीला वेग

Published On: 

औरंगाबाद : कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरातील प्रतापनगर स्मशानभुमीत क्रेडाई संस्थेच्या पुढाकाराने आणि जकात नाक्यावरील सिडको एन-६ स्मशानभुमीत पालिकेच्या वतीने गॅस दाहिनी उभारण्यात येणार आहे, अशी माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली. विभागीय आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतरच पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे मृत्यु होणारांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. त्यामुळे शहरात जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर उपचारादरम्यान रुग्ण गंभीर झाल्यावर त्याचा मृत्यू होत आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णावर शहरातील स्मशानभुमीतच अंत्यसंस्कार करावे लागत आहे. यामुळे स्मशानभुमीत अंत्यसंस्कारासाठी ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे मृतदेहाची अवहेलना होत असल्याची नातेवाईकांची भावना आहे. करीता प्रशासनाने कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर तातडीने अंत्यसंस्कारासाठी शव दाहिनी उभारण्यात यावी, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी प्रतापनगर आणि जकात नाक्याजवळील एन-६ स्मशानभुमीत गॅस दाहिनी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतापनगर येथील स्मशानभुमीत गॅस दाहिनी उभारण्यासाठी क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेने पुढाकार घेतला आहे. या संस्थेने ५० टक्के खर्च करण्याची तयारी दर्शवली असून ५० टक्के खर्च पालिका उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पालिका प्रशासनाने कैलासनगर स्मशानभुमीत गॅस दाहिनी उभारण्यासाठी ७८ लाखाची निविदा काढली होती. मात्र येथे फस्र्ट संस्थेच्या पुढाकाराने गॅस दाहिनी उभारली जाणार असल्याने निविदा रद्द केली. त्यामुळे शव वाहिनीसाठी आलेला निधी एन-६ स्मशानभुमीत गॅस दाहिनी उभारण्यासाठी वापरला जाणार आहे. शेड उभारुन यंत्रसामुग्रीची खरेदी आणि देखभाल दुरुस्ती देखील पालिकेकडून केली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!