पुणे : मार्च महिन्यापासून पुण्यासह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा एकदा स्थिती बिकट झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, प्लाज्मा आदींचा तुटवडा भासत असल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या असून ऍक्टिव्ह रुग्णांची संख्यांही वाढली आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. दुसऱ्या बाजूला मुंबईतील रुग्णसंख्या काहीशी कमी होत असताना उच्च न्यायालयाने पुण्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्येवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असेल तर पुण्यात पूर्णपणे लॉकडाउन करा, अशा सूचना देखील न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.
न्यायालयाच्या या सूचनेनंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर महत्वाचं भाष्य केलं आहे. ‘पुण्यात आता आहे तशा पद्धतीनेच नियम सुरू ठेवावेत, हवं तर आणखी कडक निर्बंध करावेत. जे लोक अनावश्यकपणे बाहेर फिरत आहेत, त्यांना रोखावं, अशी चर्चा या बैठकीत झाली. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्हा असा एकत्र आकडा येत असल्याने तो अधिक आहे. पुणे शहरात रुग्णसंख्या वाढलेली नाही, काही प्रमाणात ही संख्या कमी झाली आहे.’ असं भाष्य अजित पवार यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएल स्थगितीनंतर सकारिया गेला रुग्णालयात ; घेतली कोरोनाग्रस्त बापाची भेट, म्हणाला…
- ‘मोदीसाहेब, बंगालच्या पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?’, रुपाली चाकणकरांचा टोला
- औरंगाबादेत हेल्मेट सक्ती प्रकरण, हायकोर्टाकडून पोलिसांची खरडपट्टी
- ‘मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांची भेट घेवू’
- ‘कोरोना लसीकरणाची गती कमी होऊ देऊ नका’, पंतप्रधान मोदींचे राज्यांना आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

