Share

अग्नितांडव सुरूच : नितीन देसाई यांच्या स्टुडिओला लागली आग, जोधा अकबर सेट जळून खाक

Published On: 

कर्जत : महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे असलेल्या नेपथ्य दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओतील एका सेटला आग लागली आहे. हा सेट जोधा अकबर सिनेमाच्या सेटजवळ आहे. फायबर मूर्तींचे गोदाम आणि फायबर सेट यांना आग लागली आहे. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्टुडिओचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, या आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसून सदर घटनास्थळी खालापूरचे तहसीलदार इरेश चपळवार, पोलीस निरीक्षक अनिल विभूते, श्यामभाई साळवी, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, उपनिरीक्षक बांगर, नितीन परदेशी मंडळ अधिकारी चौक, सचिन मते हे  सर्वजन  घटनास्थळी पोहचले आहेत.

रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील चौक येथून कर्जत कडे जाणाऱ्या मार्गावर नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ आहे. या ठिकाणी शूटिंगसाठी उभारण्यात आलेल्या किल्ल्याच्या पाठीमागे आग लागून सेट जळाला.

दरम्यान,आगीच्या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.धुराचे लोट आसमंतात गेल्याचं पाहायला मिळतं आहे. याठिकाणी आग विझवण्याचं काम सुरू असून त्याचे घटनास्थळीचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!