🕒 1 min read
पुणे : देशातील कोणतीही आघाडी काँग्रेसला सोडून होऊ शकत नाही. काही राज्यांत काँग्रेस कमकुवत आहे, मात्र देशभरात पाळेमुळे रुजलेला तो एक राष्ट्रीय पक्ष आहे. सध्या प्रादेशिक पक्ष अनेक जागी सत्तेत असून केंद्रातही यापुढे एका पक्षाचे सरकार राहणार नसून ते आघाडीचे राहील. त्यामुळे २०२४ मध्ये केंद्रातील चित्र नक्की बदलेल, असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित व्याख्यानानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी खासदार राऊत यांनी एनसीबी, ईडी, केंद्रातील सरकार, आगामी निवडणुका आदी मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली.
राऊत म्हणाले, उत्तर प्रदेशात आम्ही लहान आहोत, मात्र निवडणूक नक्की लढवू. देश फार मोठा आहे. यामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत. २०२४ मध्ये एकपक्षीय सरकार जाऊन आघाडी सरकार सत्तेवर येईल. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राष्ट्रीय नेतृत्व करण्याची ताकद आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखडे प्रकरणाबाबत ते म्हणाले, समीर वानखेडे चुकीचे वागताहेत असे मी म्हणणार नाही. त्यासाठी तपास यंत्रणा काम करत आहे. मुंबईचे पोलिस तपास करत आहेत. मंत्री नवाब मलिक यांनी जे पुरावे दिले ते खरे असतील तर हे प्रकरण गंभीर आहे, इतकंच मी म्हणालो, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
केंद्रात २०२४ ला विरोधकांचे स्थान कसं असेल आणि काँग्रेसला मध्यवर्ती ठेवून आघाडी होईल का, या प्रश्नाला उत्तर देताना खासदार राऊत म्हणाले, या देशातील कोणतीही आघाडी ही काँग्रेस पक्षाला बाजूला ठेवून होऊ शकत नाही. काही राज्यांत त्यांची सरकारे नाहीत. काही राज्यात त्यांचा पक्ष अगदी कमकुवत असला तरी देशभरात पाळेमुळे रुजलेला काँग्रेस हा आजही एकमेव पक्ष आहे. बाकी सर्व प्रादेशिक पक्ष आहेत असे मत राऊत यांनी व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एमआयएम महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढणार’, असदुद्दीन ओवेसींची घोषणा
- पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस भेटीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- शरद पवारांबद्दल अपशब्द वापरल्याने तुषार भोसलेंविरोधात सहा तक्रारी दाखल
- ‘परमबीर सिंह बेल्जियममध्ये कसे गेले?’ संजय निरुपमांचा सवाल
- चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत, ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ठेवून बोलायला पाहिजे- धनंजय मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

