Share

तुमचे अश्रू म्हणजे फक्त एक इव्हेंट; मोदीजी, ‘त्या’ जनतेचे अश्रू आठवा – चाकणकर

Published On: 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसीतील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी भावुक झाले होते. कोरोनाशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक जवळच्या लोकांना गमावलं आहे, असं मोदी म्हणाले. डॉक्टरांसोबत बोलताना मोदींचा हुंदका देखील फुटला.

मात्र, यानंतर आता विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील ट्विटरद्वारे बोचऱ्या शब्दांत पंतप्रधान मोदींना खोचक टोला लगावला आहे. ‘बॅंकांच्या बाहेर प्राण सोडलेल्यांचे अश्रू आठवा, शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्यांचे अश्रू आठवा, अनवाणी पायांनी चालताना वाटेतच प्राण सोडलेल्या मजुरांचे अश्रू आठवा, ऑक्सिजन नसल्याने मृत झालेल्यांचे अश्रू आठवा, गंगेत तरंगणाऱ्यांचे अश्रू आठवा. मोदींचे अश्रू नव्हते. तर होता तो फक्त इव्हेन्ट,’ असा घणाघात रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी ?

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना मोदी म्हणाले कि, ‘मी काशीचा सेवक या नात्याने सर्व काशीवासियांचे आभार मानतो. विशेष करुन आमचे डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांनी जे काम केलंय, ते अतुलनीय आहे. या व्हायरसने आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्यापासून हिरावलं. मी त्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त करतो’ असे म्हणताना देखील त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आल्याचे देखील यावेळी पाहायला मिळाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!