सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी काल कोकण दौऱ्यावर आले होते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तोक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते हे देखील कोकणामधील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून आढावा घेत आहेत. तर, कोकणाला मदत देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी केवळ तीन तासातच आपला दौरा आटोपता घेतल्यामुळे भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता भाजप आमदार नितेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. तर, यावेळी त्यांनी शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीचं कौतुक देखील केलं आहे.
‘उद्धव ठाकरे हे कोकणात जाण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र, कपड्याची इस्त्रीही मोडून न देता ते मुंबईत परतले. याउलट एकनाथ शिंदे यांनी कोकणवासियांना मदत तरी पाठवली. त्यासाठी मी एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक कसा असतो, हे त्यांनी दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावे, हा माझा मैत्रीपूर्ण सल्ला आहे,’ असं देखील नितेश राणे यांनी आवर्जून नमूद केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आता राष्ट्रपती, पंतप्रधानांसाठी बेड्स राखीव ठेवण्याची गरज’, दिल्ली हायकोर्टाचे मत
- फडणवीसजी, लसी मिळवण्यात गुजरातचा स्ट्राइक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा ? – सचिन सावंत
- तुमचे अश्रू म्हणजे फक्त एक इव्हेंट; मोदीजी, ‘त्या’ जनतेचे अश्रू आठवा – चाकणकर
- राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे राष्ट्रपतींना पत्र
- वयाच्या ४५व्या वर्षी ‘या’ खेळाडूने केली शतकीय खेळी, चौकार आणि षटकारांचा पाडला पाऊस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

