औरंगाबाद : दररोज वाढणारी कोरोना रुग्ण संख्या पाहता शहरात ब्रेक द चेनच्या नावाखाली पूर्णत: लॉकडाऊन लावण्यात आले आहे. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशामुळे व्यापारी वर्ग आणि हातावर पोट भरणाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत व्यापारी वर्गाचा सहानुभूती पूर्वक विचार करावा यासाठी निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्रात लॉकडाउनमुळे व्यापारी वर्गाला फार त्रास सहन करावा लागत आहे. यात मार्च एंड व एप्रिलचा पहिला आठवड्याची कामे आवश्यक आहे. व्यापाच्यांना दुकानातील कामगारांचे पगार, दुकान जागेचे भाडे, बँक व्यवहार, मनपा टॅक्स, वीजबील, बँकेचे हफ्ते आदीची भरणा करावी लागते. मागील वर्षभरापासून लॉकडाउनमुळे व्यापारी आधीच मोठ्या अडचणीत आहे. यात अजून व्यापाऱ्यांच्या अडचणीत भर शासन टाकत आहे. अशा भयावह परिस्थितीमुळे जर येत्या काळात व्यापारीवर्गाची काही काही अप्रिय दुखद घटना घडल्यास यास पूर्णपणे प्रशासन जबाबदर असेल.
याची जाणीव वारंवार भारतीय जनता पार्टी आपणास करून देत आहे. प्रशासनाकडून आस्थापना, दुकाने चालू ठेवण्यास वेळेची नियमावली ठरवण्यात आले असून या अपुऱ्या वेळेमुळे दुकानवर, बाजारपेठेत गर्दी होवून कोरोनाचा प्रसार अजून वाढू शकतो. आताच्या लॉकडाउनमुळे शहरातील इतर छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे व कामगारांचे फार मोठे नुकसान होणार आहे. यामुळे शहरात बेरोजगारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, व शहरात विदारक परिस्थिती निर्माण होईल.
गतवर्षी कोरोना महामारीच्या काळात कित्येक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. आणि आता पुन्हा तीच परिस्थिती सरकारने आणली आहे. एकीकडे लॉकडाउन असतांना, मनपाची वसुली, महावितरण विजबील वसुली, शाळेची सक्तीने फी वसुलीही सुरुच आहे. ही सक्तीची वसुली त्वरित थांबावी, तसेच व्यापारी वर्गाला दुकाने सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी निवेदन दिले.
तसेच १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमासाठी १ दिवसासाठी निर्बंध हटवण्यात यावे हि मागणीही यावेळी करण्यात आली. माजी महापौर बापू घडामोडे, सरचिटणीस राजू शिंदे, राजेश मेहता, समीर राजूरकर, बबन नरवडे, सुनील सोनवणे उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- रुग्णसंख्या वाढू नये याची काळजी घ्या, मार्गदर्शक सूचनांचे पालन करा- पालकमंत्री अमित देशमुख
- वाळूची अवैध वाहतुक करणार्या दोन ट्रॅक्टर सेलूमध्ये पोलिसांनी केले जप्त
- वैजापुरात गॅसच्या स्फोटात डोळ्यासमोर घर बेचिराग!
- आता ‘गुगल पे’ , ‘पे टीएम’ ला टक्कर देणार ‘या’ कंपनीच पेमेंट अॅप
- होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांची खुलेआम लूट! पालिकेचे दुर्लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

