Share

बच्चू कडूंचा रौद्रावतार; रुग्णालय मेसमधील स्वयंपाकीच्या लगावली कानशिलात !

Published On: 

🕒 1 min read

अकोला : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यात दिवसेंदिवस नव्या कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये मोठी भर पडत असल्याने राज्य सरकारने कडक नियमावली लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने देखील उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे.

राज्यमंत्री तथा पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी हे काल अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठक देखील घेतली. या बैठकीनंतर त्यांनी अचानक जिल्हा रुग्णालयात भेट दिली. जिल्हा रुग्णालयात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यामुळे काल बच्चू कडू यांनी अचानक भेट देऊन सत्य परिस्थितीचा आढावा घेतला.

खुद्द पालकमंत्र्यांनी थेट रुग्णालयाची मेस गाठल्याने संबंधित कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती. या मेसचे कंत्राट साहेबराव कुळमेथे या कंत्राटदाराकडे आहे. तर सुनिल मोरे हा कंत्राटी कर्मचारी आहेत. बच्चू कडू यांनी काही प्रश्न कंत्राटदार व स्वयंपाक्याला विचारून उलटतपासणी केली. दररोज किती तूर व मूगडाळ लागते असा प्रश्न केला असता कंत्राटदाराने २३ किलो तर स्वयंपाक्याने आठ ते दहा किलो डाळ लागते असं उत्तर दिले. त्याला पुन्हा एकदा विचारले असता त्याने वेगळा आकडा सांगितलं.

यामुळे दररोज जवळपास १२-१३ किलोचा अपहार होत असल्याचं बच्चू कडू यांच्या लक्षात आलं आणि त्यांचा पारा चांगलाच चढला. यावेळी उपस्थितांना बच्चू कडू यांचा रौद्रावतार पाहायला मिळाला. इतकंच नाही तर त्यांनी थेट स्वयंपाकी सुनिल मोरे याच्या कानशीलात लगावली. दरम्यान, हा गैरप्रकार गेल्या आठ महिन्यांपासून सुरु असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. कारण जिल्हा रूग्णालयात कोविड रुग्णांसाठी आलेल्या धान्याची गेल्या आठ महिन्यांपासून नोंदच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.त्यामुळे आता पालकमंत्री बच्चू कडू हे अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासोबतच काय कडक कारवाई करणार ? हे देखील पाहावं लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!