Share

‘काही तरी लाज शिल्लक असू द्या रे’; निलेश राणेंची राऊतांसह शिवसेनेवर जहरी टीका

Published On: 

सिंधुदुर्ग : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर राज्यात कधीही अपेक्षित नसणारी राजकीय आघाडी झाली. शिवसेनेनं भाजपची साथ सोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. हे सरकार आल्यानंतर कधी काळी मैत्री असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपल्याच पाहायला मिळत आहे.

दरम्यान, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपसह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ‘पाच वर्षे आम्ही फडणवीस सरकारमध्ये होतो. पण शिवसेनेला भाजपसोबत सत्तेत असूनही गुलामासारखी वागणूक मिळत होती,’ असं खळबळजनक विधान संजय राऊत यांनी केलं आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं असून भाजपने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

आता भाजप नेते निलेश राणे यांनी अत्यंत जहरी शब्दांत संजय राऊत यांच्यासह शिवसेनेला लक्ष्य केलंय. ‘संज्या राऊत म्हणतो भारतीय जनता पक्षाने एकत्र सत्तेत असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक दिली पण शिवसेना गुलामगिरी सहन करत नाही. पाच वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्ता उपभोगली, खाल्लेल्या ताटात थुंकणे हीच सवय शिवसेनेची कायम राहिली आहे. काही तरी लाज शिल्लक असू द्या रे,’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!