Share

औट्रम घाटा पाठोपाठ गौताळा घाटात कोसळली दरड; वाहतूक विस्कळीत

Published On: 

औरंगाबाद : औट्रम घाटा पाठोपाठ आता कन्नड घाटात दरड कोसाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे औट्रम घाटाला पर्यायी असलेल्या गौताळा घाटातून जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी ये जा करणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

जिल्ह्यात चांगल्या प्रमाणात पाउस झाल्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहे. त्यातच मागील आठवड्यात झालेल्या चांगल्या प्रमाणातील पावसामुळे औट्रम घाटातील दरड कोसळली होती. त्याचा मलबा हटविण्याचे कार्य सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला वळविण्यात आलेल्या, नागदमार्गावरील गौताळा घाटात मंगळवारी दरड कोसळल्याची माहिती वन विभागाच्या सुत्रांनी दिली.

दरम्यान, यामुळे मालेगाव, धुळे, सुरत, इंदोरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नागदमार्गे पर्यायी वळविण्यात आली होती. त्यात आता गौताळा घाटात पुन्हा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने, पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलिया आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!