Share

पुणे : भाजप नगरसेवक महेश लडकत यांचे निधन

Published On: 

पुणे : भाजपचे पुण्यातील नगरसेवक महेश लडकत यांचं काल पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 53 वर्षांचे होते. महापालिका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, शहर सुधारणा समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. उद्द्यम सहकारी बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते.

महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत लडकत हे नव्या पेठेतून निवडून आले. त्यानंतर ते शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष झाले. तेव्हा, महापालिकेत समावेश झालेल्या येवलेवाडीचा विकास आराखडा (डीपी) त्यांनी मंजूर केला, त्याआधी २००७ – २००८ मध्ये ते शिक्षण मंडळाचे सदस्य होते.

त्याचकाळात लडकत यांच्याकडे समितीचे अध्यक्षपद आले. या काळात नवनव्या योजना राबवून लडकत यानी प्रथमच महापालिकेच्या शाळांत बदल केले. मागील आठवड्यात भाजपचे आणखी एक नगरसेवक विजय शेवाळे यांचेही निधन झाले आहे.

नगरसेवक लडकत हे खासदार गिरीश बापट यांचे खंदे समर्थक होते.11 ऑक्टोबर 1967 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी , एक कन्या, २ बंधु एक भगिनी….असा परिवार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!