नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
या आंदोलकांमध्ये प्रामुख्याने पंजाबमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, हरियाणातील एका गावात संतप्त ग्रामस्थांनी आपल्या गावात भाजप आणि जेजेपीच्या नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. कर्नालमधील इंद्री गावातील कादराबादच्या ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे. जर भाजप किंवा जेजेपीच्या नेत्यांनी गावात घुसण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चपलेचा हार घातला जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांनी गावाबाहेर एक बॅनर लावला आहे. जो शेतकऱ्यांच्या बाजूने बोलेल तोच गावात राहिल, असे बॅनरवर लिहिलण्यात आले आहे. केंद्र सरकारने लागू केलेले तिनही नवीन कृषी कायदे शेतकऱ्याच्या हिताचे नाहीत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. असे त्या बॅनरवर लिहले आहे.
दरम्यान, नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ पंजाब, हरियाणा येथील शेतकरी गेल्या चार आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करीत आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, आम्ही पंजाबच्या शेतकरी संघटनांसह देशातील अनेक शेतकरी संघटनांशी चर्चा करीत आहोत आणि लवकरच यावर तोडगा निघू शकेल.
महत्वाच्या बातम्या
- चित्रपटांमुळे चर्चेत असलेला अक्षय कुमार आता ‘या’ कारणामुळे आला चर्चेत
- पुणे : भाजप नगरसेवक महेश लडकत यांचे निधन
- सरकारने निर्यात बंदी उठवताच कांद्याच्या भावात वाढ; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
- धक्कादायक : भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल, सहा जण पॉझिटिव्ह
- नववर्ष स्वागताला ‘बसायचा प्लॅन’ करत असाल तर सावधान, ‘अशी’ असेल नियमावली


