🕒 1 min read
मुंबई : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना घेऊन असतात. जेणेकरून त्याचा फायदा जिओ ग्राहकांना मिळू शकेल. यातच आता रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक काही नवीन प्रीपेड प्लॅन आणले आहेत. या सोबतच कंपनीनं ग्राहकांना Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शनही दिलं आहे.
कंपनीचे हे नवे प्लॅन्स 1 सप्टेंबर 2021 पासून लागू होणार असून, या प्लॅनची किंमत 499 रुपये, 666 रुपये, 888 रुपये, 2599 रुपये आणि 549 रुपये असणार आहे. जिओच्या या प्लॅन्समध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन दिले जाणार आहे.
499 रूपये प्लॅन
499 रुपयांचा प्लॅन आता 28 दिवसांच्या वैधतेसहदेखील उपलब्ध असेल. यामध्ये ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा,मोफत व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएस सुविधा दिली जाणार आहे.
549 रूपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये व्हाईस कॉलिंग आणि एसएमसच्या सुविधा देण्यात येत नाही. यात ग्राहकांना ५६ दिवसांच्या वैधतेसह रोज 1.5 जीबी डेटा देण्यात येतो. तसंच सर्व कॉन्टेन्टसह वर्षभरासाठी डिस्ने + हॉटस्टारचं सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.
666 रुपये प्लॅन
तर 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56 दिवसांची वैधता असले. यामध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएस असेल. यासोबत जिओ अॅप्ससह आणि 1 वर्षासाठी डिस्ने + हॉटस्टारचं संपूर्ण सबस्क्रीप्शनही घेता येते.
888 रूपये प्लॅन
888 रुपयांच्या प्लॅन सुमारे तीन महिने असेल. यामध्ये ग्राहकांना 84 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2 जीबी डेटा, मोफत व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएस मिळतील. जिओ अॅप्सच्या सबस्क्रिप्शनसह या योजनेला 1 वर्षासाठी डिस्ने + हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन देण्यात येणार आहे.
2599 रूपये प्लॅन
2599 रुपयांचा एक प्लॅन उपलब्ध आहे. हा प्लॅन आधीच उपलब्ध होता. यामध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा, मोफत व्हॉइस कॉलिंग, एसएमएस आणि 365 दिवसांसाठी जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही देण्यात येते. तसंच या प्लॅनसोबत डिस्ने + हॉटस्टारचं सबस्क्रिप्शनही देण्यात येते.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना नियमावलीचं पालन करत तामिळनाडूसह दिल्लीमधील शाळा होणार सुरु
- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- गांधी परिवाराची बदनामी करणारा व्हिडिओ केल्याप्रकरणी पायल रोहतगी विरोधात पुण्यात गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
