Share

…तर तोंडाच्या वाफा दवडण्याचा जागतिक पुरस्कार उद्धव ठाकरेंना मिळाला असता

Published On: 

मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने धुमशान माजवल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हाताशी आलेल्या सोन्यासारख्या पिकासह शेतातील मातीदेखील वाहून गेल्याने शेतकरी मायबाप हतबल झाले आहेत. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असून लवकरात लवकर सरसकट मागणी करावी अशी मागणी देखील केली आहे.

विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापुरच्या अक्कलकोट तालुक्यातील काही नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या या दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पुढील कार्यवाहीची माहिती दिली आहे.

यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘फडणवीस बिहारला जातात त्यांनी दिल्लीला जावं पंतप्रधान घराबाहेर पडतील’ असा टोला लगावला आहे. मी कोणतीही घोषणा केली नाही, हे करु ते करु, सांगितलेलं नाही. आधी अंदाज घेऊ, माहिती घेऊ आणि जे करायचं ते करु असं त्यांनी सांगितलं आहे. तर, सद्या पंचनामे सुरु आहे, त्यानंतर प्रत्यक्ष मदत करू, असं ठाकरेंनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी बोचऱ्या शब्दांत ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. ‘तोंडाच्या वाफा दवडण्याबद्दल एखादा जागतिक पुरस्कार असता तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाच मिळाला असता. शेतकऱ्यावर आलेली भीषण आपत्ती पाहून त्यांना मदत करण्याची दानत नाही आणि कर्तृत्वही नाही, शेतकऱ्याचे अश्रू पुसणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांची सवंग टीका मात्र सुरू आहे.

यासोबतच मुख्यमंत्र्यांनी यावेळी मदतीची जाहीर घोषणा न केल्यानं त्यांच्या दौऱ्यावर देखील भातखळकरांनी निशाणा साधला आहे. ‘पूरग्रस्तांनो तुम्ही काळजी घ्या, सावध राहा… पण एवढ्यात मी मदत जाहीर करणार नाही… उद्धव ठाकरे मदत देणार नाही हे सांगायला सोलापूरला जाण्याची काय गरज होती, ते नेहमी प्रमाणे घरबसल्याही सांगता आलं असतं. ‘ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी करत उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!