सोलापूर : राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. विक्रमी अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे बिघडलेलं आर्थिक चक्र, वादळ, कीड, बोगस बियाणं अशा संकटातून जेवढं पीक पिकवलं ते देखील या पावसामुळे वाहून गेलं आहे. काही गावात तर शेतातील मातीदेखील वाहून गेल्याने परत उभं राहायचं कसं? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
राज्यातील नुकसानग्रस्त भागांमध्ये विविध मंत्री आढावा घेत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आज सोलापूरमध्ये पाहणी केली. तर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीपासून आढावा घेण्यास सुरुवात केली असून त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी, ‘शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आधी राज्याच्या सरकारने मदत करावी’, अशी मागणी केली आहे.
तर, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या या दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पुढील कार्यवाहीची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘फडणवीस बिहारला जातात त्यांनी दिल्लीला जावं पंतप्रधान घराबाहेर पडतील’ असा टोला लगावला आहे. केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही, तर ते देशाचं सरकार आहे. त्यामुळे विरोधक केवळ पक्षाचा विचार करत असतील, मात्र केंद्रातील सरकार देशाचं आहे. त्यांनी पक्षपात न करता मदत करणं अवश्यक आहे.’ असं भाष्य केलं आहे.
बॉलिवूडच्या काळजीत बुडालेले मुख्यमंत्री घराबाहेर पडले
भाजपचे नेते व आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारसह उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. ‘बॉलीवुडच्या काळजीमध्ये आकंठ बुडालेले मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी घराबाहेर पडले हेच आशावादी चित्र आहे. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन ते थेट मदत करतील अपेक्षा आहे. ‘ असा टोला शेलारांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आइटम’ हा सर्रास वापरला जाणारा शब्द आहे,यामध्ये अपमानजनक काय आहे?
- साखर कारखानदारांसाठी तुमच्याकडे पैसे आहेत मग शेतकऱ्यांना मदत देताना हात आखडता का ? – राजू शेट्टी
- केंद्र सरकार हे देशाचं सरकार, मोदींनी फोन करून विचारपूस केल्यावर पटलं
- संकट कायम : राज्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याकडून इशारा
- ‘बाबा तुम्ही आता आराम करा, तुमचा लेक धनंजय मुंडे तुमच्या पुढच्या वाऱ्या करत जाईन’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

