🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.
या सामन्यात गोलंदाजीसह फलंदाजीतही दमदार प्रदर्शन करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा शार्दुल ठाकूरचा राहिलेला आहे. दरम्यान फलंदाजी करताना त्याने काही आकर्षक शॉट खेळले होते, ज्यामध्ये कव्हर ड्राइव्हचा समावेश होता. यानंतर भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी शार्दुलच्या कव्हर ड्राइव्हची मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरशी तुलना केली आहे. सोबतच त्याला नवे टोपणनावही दिले आहे.
शार्दुलची धावसंख्या ही भारताच्या पहिल्या डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली होती. यावेळी त्याने शानदार कव्हर ड्राइव्हवर चौकारही लगावले होते. त्याच्या त्या अप्रतिम शॉटला पाहिल्यानंतर श्रीधर यांना भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन याच्या कव्हर ड्राइव्ह शॉटची आठवण झाली. त्यामुळे श्रीधर यांनी शार्दुलच्या कव्हर ड्राइव्हची सचिनशी तुलना केली आहे. ‘सचिन तेंडूलकरनंतर भारतीय संघाकडे शार्दुलकर आहे, जो अतिशय सुंदर कव्हर ड्राइव्ह खेळत आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पवारांचा दुटप्पीपणा, एकीकडे कृषी कायद्यांना विरोध तर दुसरीकडे गात आहेत करार शेतीचे गोडवे
- राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंचा विसर ? भाजप नेते म्हणतात, शिवसेनेला जागा दाखवली !
- शिवसेना आमदाराच्या गोलंदाजीवर उर्मिला मातोंडकरांची फटकेबाजी
- ‘ममता बॅनर्जी यांचा ‘वीक पॉइंट’ बंगाल भाजपने ओळखला आहे; ममताजींनी चिडायला नव्हतं पाहिजे’
- वरुण धवन आणि नताशा दलाल अडकले लग्नबंधनात

