Share

शिवसेना आमदाराच्या गोलंदाजीवर उर्मिला मातोंडकरांची फटकेबाजी !

Published On: 

मुंबई : २ महिन्यांपूर्वी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर त्या शिवसेनेत सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज त्या दिंडोशीतील एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दिंडोशीमध्ये अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धा ‘आमदार चषक 2021′ आयोजित करण्यात आलं आहे.

यावेळी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू हे देखील उपस्थित होते. उर्मिला मातोंडकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी आमदार सुनील प्रभूंनी चेंडू हातात घेऊन गोलंदाजी केली. तर, मातोंडकर यांनी फलंदाजी करत चांगलीच फटकेबाजी केली. यावेळी उपस्थितांमध्ये देखील चांगलाच उत्साह संचारला होता.

‘इथे क्रिकेट खेळताना आणि पाहताना आयपीएल आणि सर्व एकत्र झाल्यासारखं वाटलं. एवढ्या कमी ओव्हरमध्ये इतकी मजा येईल, मजेशीर मॅच होईल असं मला वाटलं नव्हतं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वाचं अभिनंदन आणि आयोजकांचे खूप धन्यवाद. आमदार सुनील प्रभू यांनी गोलंदाजी करुन मला फलंदाज करुन टाकलं.’ अशी प्रतिक्रिया देखील उर्मिला मातोंडकर यांनी दिली. एवढंच नाही तर, मी फकीर एक अभिनेत्री, राजकारणी नसून आता क्रिकेटर देखील आहे, हे भारतीय महिला क्रिकेट टीमने लक्षात ठेवावं, असं मिश्किल भाष्य केल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!