मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा मौसम चालू आहे. या वर्षी बॉलिवूड मधील प्रसिद्ध कपल लग्ग्नाच्या बंधनात अडकणार त्यातच बॉलिवूड मधील क्युट कपल नताशा आणि वरून देखील काल लग्नबंधनात अडकले आहेत. वरून नताशाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वरूनचे चाहते त्याला लग्नाच्या भरभरून शुभेच्छा देखील देत आहे. काल रविवारी या वरुण-नताशा यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे.
या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वरुण धवनने आपल्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो पत्नी नताशासोबत दिसत आहे. रविवारी अलिबागमधील द मॅन्शन हाऊसमध्ये वरुण आणि नताशाचा विवाहसोहळा पार पडला. वरूनने आपल्या लग्नाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करून चाहत्यांना हि बातमी दिली.
https://www.instagram.com/p/CKb3BcTBEMs/?utm_source=ig_web_copy_link
फोटोमध्ये वरुण धवन आणि नताशा सिल्व्हर आउटफिटमध्ये दिसत आहेत. फोटोत वरुण आणि नताशाच्या मागे डेव्हिड धवन आणि लाली देखील दिसत आहे. वरुणने हा फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आयुष्यभराचं प्रेम आता अधिकृत झालं.’ वरुणचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करून त्याला शुभेच्छा देत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पवारांचा दुटप्पीपणा, एकीकडे कृषी कायद्यांना विरोध तर दुसरीकडे गात आहेत करार शेतीचे गोडवे
- राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंचा विसर ? भाजप नेते म्हणतात, शिवसेनेला जागा दाखवली !
- शिवसेना आमदाराच्या गोलंदाजीवर उर्मिला मातोंडकरांची फटकेबाजी
- ‘पुरंदरचं प्रस्तावित विमानतळ बारामतीला हलवण्याचा पवारांचा डाव’ ; शिवसेना नेत्याचा आरोप
- ‘ममता बॅनर्जी यांचा ‘वीक पॉइंट’ बंगाल भाजपने ओळखला आहे; ममताजींनी चिडायला नव्हतं पाहिजे’


