मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची काल ९५ वी जयंती होती. यानिमित्त राज्यासह देशातील अनेक नेत्यांनी त्यांना अभिवादन केले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरवरून बाळासाहेब ठाकरेंच्या दृढनिश्चयाची आठवण देखील सांगितली. मात्र, शिवसेनेसोबत सद्या सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसच्या राहुल गांधींना मात्र बाळासाहेबांचा विसर पडल्याचे दिसून आले.
यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेनं काँग्रेसची साथ घेतल्यापासून भाजप सतत टीकास्त्र सोडत असल्याचं दिसून येत असतानाच राहुल गांधींनी साधं ट्विट देखील न केल्याने भाजपला चांगली संधीच मिळाली आहे. ‘न्यूज डंका’मधील दिनेश कानजी यांच्या लेखात शिवेसेनेवर टीका करण्यात आली आहे. अतुल भातखळकर यांनी हाच लेख ट्विट करतानाच ‘राहुल गांधींनी शिवसेनेला जागा दाखवली’ अशी बोचरी टीका देखील केली आहे.
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वपक्षीय नेत्यांनी अभिवादन केले असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र त्यांच्याबाबत आदर व्यक्त करणासाठी चार ओळीचा ट्विट ही केला नाही.’ असं या लेखातून सांगण्यात आलं आहे. यासोबतच सामनातून दर चार दिवसाला राहुल गांधींची आरती ओवाळली जात असताना त्यांनी मात्र शिवसेनेला जागा दाखवून दिली,’ अशी बोचरी टीका दिनेश कानजी यांनी या आपल्या लेखातून केली आहे.
राहुल गांधींनी शिवसेनेला जागा दाखवली
https://t.co/ANW38FD8c9राहुल-गांधींनी-शिवसेनेला/3930/— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 24, 2021
महत्वाच्या बातम्या
- पवारांचा दुटप्पीपणा, एकीकडे कृषी कायद्यांना विरोध तर दुसरीकडे गात आहेत करार शेतीचे गोडवे
- रामदास आठवले दुबईत साजरा करणार भारतीय प्रजासत्ताक दिन
- अर्णब गोस्वामींना लवकरात लवकर अटक करा!: अतुल लोंढे
- गोपीनाथ मुंडें नंतर ओबीसी समाजाची धुरा आता भुजबळ साहेबांकडे : वडेट्टीवार
- ‘ओबीसींच्या हक्कासाठी वेळ पडल्यास भाजपविरोधातही बंड करू’


