Share

पवारांच्या ‘त्या’ मागणीला माजी पोलीस आयुक्तांनी दिलं उत्तर; म्हणाले…

Published On: 

मुंबई  – मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आणि महाराष्ट्रासह देशात एकच खळबळ माजली. महाविकास आघाडीच्या नेत्याचे तोंडचे पाणी पळाले असून बैठकांवर बैठका घेण्याचा धडाका सुरु आहे.

खासदार शरद पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली होती सोबतच या प्रकरणाची मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी झाली पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले होते.

दरम्यान ज्युलिओ रिबेरो यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्याला ऑफर देण्यात आली तरी हे काम करणार नाही असं स्पष्ट केलं आहे. “अशा गोंधळलेल्या परिस्थितीला मी स्पर्श करु इच्छित नाही. ही अत्यंत अवघड परिस्थिती असून या सगळ्याचा शेवट कुठे घेऊन जाईल हे मला माहिती नाही. त्यामुळे राजकारण्यांनीच यावर तोडगा काढून परिस्थिती पूर्ववत करणं योग्य आहे,” असं ते म्हणाले आहेत.

शरद पवार किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली तरी आपण हे काम स्वीकारणार नाही असं ठामपणे ज्यूलिओ रिबेरो यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!