🕒 1 min read
अहमदाबाद : पाच टी20 सामन्यां 2-2 अशी बरोबरी असताना अखेर भारतीय संघाने पाचव्या आणि निर्णायक क्रिकेट सामन्यात बाजी मारली आहे. दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर संघाला हे यश संपादन करण्यात आलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या ५ टी२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ३-२ ने विजय मिळवला आहे. मात्र यानंतर भारतीय संघावर आयसीसीतर्फे दंड आकारण्यात आला आहे.
तसेच संघाच्या फलंदाजी क्रमवारीत बदलदेखील पाहायला मिळाले. पहिल्या ४ टी-२० सामन्यात केएल राहुलने डावाची सुरुवात केली होती. परंतु त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे ५ व्या टी -२० सामन्यात त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. सध्या खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या राहुलचे माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने समर्थन केले आहे.
गंभीरने राहुलला समर्थन देत म्हटले आहे की, ‘कोणालाही संघातून वगळून आपण त्याची मदत करू शकत नाही. राहुलने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत खेळावे. जर कोणी चांगल्या फॉर्ममध्ये नसेल तर त्याला खेळण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास तो खेळाडू पुन्हा फॉर्ममध्ये येऊ शकतो.’
तसेच गंभीर पुढे म्हणाला की, ‘भारतीय संघ ६ गोलंदाजांसह मैदानात उतरला. मी या निर्णयाशी सहमत आहे. कारण भारतीय संघात नेहमीच गोलंदाजांची कमतरता जाणवते. यावर एकच उपाय होता, केएल राहुलला बाहेर काढून एका गोलंदाजाला संघात संधी देण्यात यावी. हीच रणनिती भारतीय संघाने अंमलात आणली. परंतु त्यांनी वनडे मालिकेत राहुलला आणखी एक संधी द्यायला हवी.’
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना लस न घेताच मिळालं लस घेतल्याचं प्रमाणपत्र; प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड
- ‘आता देशमुखांनी परमबीर सिंह यांच्या काळ्या कारनाम्याची माहिती देणारे १६ पानी पत्र प्रसिद्ध करावे’
- ‘दिल्लीतील बैठका म्हणजे १०० कोटीच्या हिस्सेदारांची चाललेली धावपळ’
- महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्र ‘दिल्ली’, दिल्लीत राष्ट्रवादीची बैठक सुरु
- मोठी बातमी : अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
