Share

बेळगाव महापालिका निवडणूक निकाल; भाजपला स्पष्ट बहुमत

Published On: 

बेळगाव : कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने २९  आाकड्याची मॅजिक फिगर ओलांडली आहे. भाजप, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि काँग्रेस यांच्यात जोरदार रंगत रंगली होती.

बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचे राऊतांनी बोलून दाखवलेलं स्वप्न मात्र भंग पावल्याचं स्पष्ट दिसत आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेली.

आमचे ३० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर भाजपने बेळगाव महापालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. ५८  प्रभागात ३८५  उमेदवार आपलं नशीब आजमवत होते. त्यापैकी जवळपास निम्म्या जागांवरचा निकाल जाहीर झाला आहे. तर पुढच्या काही तासांत उर्वरित जागांचा निकाल हाती येईल.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!