Share

“…तशी वेळ आल्यास महाराष्ट्र गप्प बसणार नाही”, सुभाष देसाईंचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना प्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्यावतीने मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उद्योग मंत्री सुभाष देसाई (Industry Minister Subhash Desai) यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, दिवाकर रावते आदी उपस्थित होते. यावेळी देसाई यांनी मोठे वक्तव्य केले.

“महाराष्ट्राला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो, हा इतिहास आहे. तशी वेळ आल्यास महाराष्ट्र गप्प बसणार नाही. महाराष्ट्र आत्ता शेवटी हात जोडून विनंती करतो. परंतु हात सोडायला वेळ लागणार नाही. मुंबईचे मराठी हित राखण्यासाठी मराठी माणसांनी जे प्रयत्न केले, त्याला तोड नाही. या पुढील वाटचालीसाठी तुम्हा सर्वांची अशीच साथ असू द्या.”, असे सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

तसेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण सुरू केलेली चळवळ लवकरच पूर्णत्वास जाईल यात शंकाच नाही. असेही सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना मराठी माणसांसाठीच केली आहे. आता राज्यात सर्व पाट्या मराठी भाषेतून लावण्याची सक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. येत्या अधिवेशनात कायदा केला जाईल, महाराष्ट्रातील गावागावात मराठी भाषा, पाट्या प्रामुख्याने झळकतील. स्थानीय लोकाधिकार समिती यावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. आपण मराठीचा हट्ट धरला पाहिजे. मराठीचा मान सन्मान राज्यात राखला पाहीजे. त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात काम समितीने केले पाहीजे. तरच मराठीची उन्नती होईल. असेही सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

चर्नी रोड येथे मराठी भाषा भवन तयार होत आहे. काही दिवसांत भूमिपूजनही होईल. आपल्याला, तमाम मराठी प्रेमींना अभिमान वाटेल, असे भव्य मराठी भाषा भवन उभारले जाणार आहे. मराठी किती श्रेष्ठ आहे, याचे दर्शन मराठी भाषा भवनामध्ये होईल. मराठीच्या संवर्धनासाठी परदेशातील अनेक मराठी मंडळी जोमाने काम करतात. दुबईत ४१ मराठी मंडळांनी सादरीकरण केले. असे कार्यक्रम महाराष्ट्रात व्हावेत, मराठी भाषा भवनमध्ये जगभरातील मराठी मंडळीशी जोडले जावू, त्यासाठी व्हर्चुअल क्लासरूम सुरू करणार आहोत. असेही सुभाष देसाई यांनी सांगितले आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी माध्यमांनी आग्रह धरला आहे. परंतु अद्याप अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नाही. केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पण कधी घोषणा करणार? सर्व पुरावे देऊन झाले, तरीही घोषणा होत नाही. अशी टीकाही सुभाष देसाई यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!