Share

Russia -Ukraine War: युक्रेनमधून भारतात येण्यास तरुणीने दिला नकार; कारण कौतुकास्पद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या युक्रेन आणि रशिया या दोन युरोपीय देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने NATO ( नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) मध्ये सहभागी होऊ नये ही व्लादिमीर पुतीन यांची प्रमुख मागणी आहे आणि याच मागणीला धरुन  रशियाने युक्रेन देशावर आक्रमण केले आहे. युद्ध जरी रशिया आणि युक्रेनमध्ये चालू असले तरी त्याची झळ संपूर्ण जगाला बसत आहे. भारताला पण या युद्धाची झळ अप्रत्यक्ष रित्या बसली आहे.

भारत देशातील हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घ्यायला दरवर्षी युक्रेनला जातात. परंतु आता युद्ध चालू असल्यामुळे अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेन देशात अडकले आहेत. कालच भारत सरकारने ५०० भारतीय मुलांना मायदेशी आणले आहे. मात्र युक्रेनमध्ये एक भारतीय तरुणी अशी पण आहे कि तिने भारतात परतण्यास नकार दिला आहे आणि तिच्या या निर्णयामुळे तिचे सर्व ठिकाणांहून कौतुक पण होत आहे. हरियाणा राज्याची रहिवासी असणाऱ्या नेहाने युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमध्ये पण भारतात परत येण्यास नकार दिला आहे. नेहा युक्रेनमध्ये ज्या घरात भाड्याने राहते त्या घराचा मालक रशिया विरुद्धच्या लढाईसाठी युक्रेनमधील सैनिकांना मदत करायला रस्त्यावर उतरला आहे.

मात्र असे करत असताना त्याने आपल्या कुटूंबियाची जबाबदारी नेहा वर सोपवली आहे. नेहा ने सुद्धा त्या कुटुंबामधील ३ मूल आणि त्याची पत्नी यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तिने भारतात पाठवलेल्या निरोपानुसार युक्रेनमध्ये सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव होत असून आम्ही जिवंत राहू कि नाही याबद्दल खात्री नसली तरी मी या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली आहे. तिच्या या निर्णयाचे जगभरातून कौतुक होत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!