🕒 1 min read
नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ तब्बल २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर पोहोचला आहे. (Australia on Pakistan tour after 24 years) ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तानविरुद्ध 3 कसोटी, 3 एकदिवसीय आणि एक टी-२० सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
या दौऱ्याची सुरुवात ४ मार्चपासून तीन कसोटी सामान्यांपासून होणार आहे. त्यानंतर २९ मार्च रोजी एकदिवसीय मालिका आणि ५ एप्रिल रोजी एकमेव टी-२० सामना होईल. ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्सने कर्णधारपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिला परदेशातील कसोटी सामना असणार आहे. तसेच जस्टिन लँगर यांच्या राजीनाम्यानंतर अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांची कसोटी मालिकेसाठी अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Arrived in ???????? pic.twitter.com/pnis0ckFeO
— Steve Smith (@stevesmith49) February 27, 2022
दरम्यान १९९८ नंतर ऑस्ट्रेलिया प्रथमच पाकिस्तानचा दौरा करत आहे. तसेच ऑस्ट्रेलियन खेळाडू इस्लामाबादमध्ये ज्या हॉटेलमध्ये राहणार आहेत आणि रावळपिंडीतील क्रिकेट स्टेडियमवर ४००० पोलीस आणि लष्करी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “मुख्यमंत्री सहा महिने घराबाहेरच न निघाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला”, रावसाहेब दानवेंचा टोला
- श्रेय कुणीही घ्या, पण मराठीचा मान राखा- संजय राऊत
- Russia-Ukraine war : युक्रेनहून सुमारे ५०० भारतीय विद्यार्थ्यांना देशात आणले
- “भाजपशासित राज्यांमध्ये इन्कमही नाही आणि टॅक्सही नाही”, राऊतांचा हल्लाबोल
- ईडीच्या धाडींवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘आम्ही हा त्रास सहन करायला…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

