मुंबई : कोरोना महामारीने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना महामारी आटोक्यात येत असली तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.
दरम्यान, आता सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जनतेला याबाबत कळकळीचे आवाहन केलं आहे. ‘महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. नव्हे तर कोरोनाने जोरदार धडक द्यायला सुरुवात केलीय. अमेरिकेत तिसऱ्या लाटे जीवन अत्यावस्त केले. चीनही विळख्यात सापडलाय. आपल्या देशातच केरळ राज्यात रोज ३०,००० नवे रुग्ण समोर येत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे व तो आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतला नाही, तर महाराष्ट्राला जनजीवनाची फार मोठी किंमत चुकवावी लागेल. सरकार सुविधा निर्माण करील, पण त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करा,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
‘मी विनंती करतो…सर्वच पक्षांनी राजकीय कार्यक्रम, सभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत’
‘कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या,’ असं देखील ठाकरे यांनी आवाहन केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांना ईडीने लूक आऊट नोटीस बजावल्यानंतर फडणवीसांनी दिला ‘हा’ सल्ला
- …म्हणून संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यात भाजपने दाखल केली तक्रार
- जावेद अख्तर यांनी केलेले वक्तव्य तालिबानमध्ये केले असते तर चौकात फटके मारले असते- सुधीर मूनगंटीवार
- ‘संजय राऊत हळूहळू खरं बोलायला लागलेत’; आशिष शेलार यांचा खोचक टोला
- सण-उत्सव नंतरही साजरे करू…हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल – मुख्यमंत्री ठाकरे


