Share

…तर महावितरणला झटका दाखवू: आ. संभाजीराव पाटील निलंगेकर

Published On: 

🕒 1 min read

लातूर : कोरोना काळात महावितरणने अनेक शेतकरी, सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना अधिकचे वीज बील आकारले होते. यासंदर्भात निलंगा तालुक्यातील अनेकांनी माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे तक्रार केली होती. भविष्यात जर महावितरणने पुन्हा अधिक वीज बिल आकारले तर मी स्वत: लातूर येथे मोठे आंदोलन उभे करु आणि वीज बिलाची होळी करु असे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सोशल मिडीया द्वारे सांगितले.

मागील वर्षी अनेक उद्योगधंदे हे लॉकडाउन आभावी बऱ्याच कालावधीसाठी बंद होते. तरीही महावितरणने अधिक वीज बिल आकारणी केली. आणि कोरोना संसर्ग ओसरु लागल्यानंतर वीज बिल वसुलीसाठी तगादा लावला. यामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहर आणि ग्रामीण भागातही आगाऊ बिले आल्याने अनेक नागरिक महावितरणवर नाराज आहेत. सुरुवातीच्या काळात वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले. मात्र, नंतर राज्य सरकारने सक्तीने वीज बिल वसुली सुरु केली.

येणाऱ्या काळात विनाकारण आगाऊ वीज बिल दिले तर महावितरणला आपण ४४० चा झटका दाखवून देऊ असे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी फेसबूक लाईव्हच्या दरम्यान म्हणाले. यावेळी आमदारानी आगाऊ बिले दिल्याने राज्य सरकारवर टिकास्ञ सोडले. दोन दिवसापुर्वी महावितरणने थकीत वीज बिलापोटी लातूर शहर मनपाचा वीज बिल पुरवठा खंडीत केला होता. यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडीत झाला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!