Share

IPL सुरु होण्याआधी देव दर्शनाला पोहोचला धोनी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे संपन्न झाला. या लिलावामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा लिलाव झाला तर काही खेळाडू ‘अनसोल्ड’ म्हणजेच विकले गेले नाहीत. खेळाडूंच्या लिलावानंतर सर्व संघांनी आगामी हंगामाची तयारी सुरू केली.

आयपीएल लिलावानंत खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांसह ही आयपीएल खास असणार आहे. कारण कोरोनानंतर पहिल्यांदाच आयपीएलचं आयोजन हे भारतात केलं जाणार आहे. दरम्यान आयपीएलचा थरार हा भारतातील 6 राज्यात रंगणार आहे.  याआधी फक्त 5 शहरांची नावं निश्चित होती. तर मुंबईबाबत निर्णय झाला नव्हता. पण सरकारने परवानगी दिल्याने आता मुंबईलाही आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे आता मुंबईसह, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरु आणि कोलकातामध्ये सामन्यांचं आयोजन करण्यात येणार आहे.

आयपीएलचा  14 वा मोसम सुरू व्हायला आता काही आठवड्यांचा काळच बाकी आहे. त्याआधी चेन्नईचा (CSK) कर्णधार एमएस धोनी देव दर्शनाला पोहोचला. आयपीएल 2020 साली चेन्नईची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. आता या आयपीएल आधी तो देवडी माता मंदिरात गेला. धोनीची या मंदिरावर आस्था आहे. प्रत्येक मोठ्या सीरिज आणि स्पर्धेआधी धोनी या देवीचं दर्शन घेण्यासाठी जातो.

धोनीसोबत त्याचा लहानपणीचा मित्र सिमत लोहानी देखील होता. धोनी येणार म्हणून मंदिराच्या परिसरात चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. टेलिग्राफ इंडियाच्या वृत्तानुसार मंदिराच्या पुजाऱ्याला धोनी येणार याची आधीच कल्पना होती. तो यायच्या एक तास आधीच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!