🕒 1 min read
नवी दिल्ली : सर्वसामान्यांना मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे, कारण एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. आधीच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्य नागरिकाच्या खिशाला कात्री बसलेली असतानाच आता एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीही वाढवल्या आहेत. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती २५ रुपयांनी वाढवल्या आहेत. चार दिवसांपूर्वीही एलपीजी गॅसच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ झाली होती.
आता २५ रुपयांची वाढ झाल्याने १४.२ किलो गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये ८१९ रुपये एवढी झाली आहे. हे नवीन दर आजपासून लागू होत आहेत. याआधी २५ फेब्रुवारीला २५ रुपयांनी वाढ केली होती. तसेच, ४ फेब्रुवारीला सुद्धा २५ रुपयांनी वाढ केली होती. तर १४ फेब्रुवारीला ५० रुपयांनी दर वाढवले होते.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीचे दर बदलतात. पण जानेवारी महिन्यात तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या दरात वाढ केली नव्हती. मात्र फेब्रुवारीमध्ये एलपीजी गॅसच्या किंमती जवळपास १०० रुपयांनी वाढवल्या. या दरवाढीचा सर्वसामान्यांना मात्र मोठा फटका बसणार आहे, हे मात्र निश्चित.
महत्त्वाच्या बातम्या
- पालकमंत्र्यानी आतातरी जागे व्हावे! भाजप महिला आघाडीचा सवाल
- सर्जरीनंतर अभिताभ बच्चन यांनी ट्वीट करून मानले चाहत्यांचे आभारआपलं; आयुष्यासंबंधी दिला बहुमोल संदेश
- ‘कॅाग्रेसची अवस्था दयनीय झाली हे मात्र खरं’, सायकल आंदोलनावरून भाजपचा घणाघात
- शिवजयंतीसाठी लागू होणारे कोरोनाचे नियम पब,नाईट लाईफसाठी लागू होत नाहीत का ?
- महाराष्ट्राला 29 हजार कोटींचा GST परतावा केंद्राकडून येणं बाकी – राज्यपाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
