Share

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी शिवसेनेतून ‘या’ आमदारांची नावे आहेत चर्चेत

Published On: 

मुंबई : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंध जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर रविवारी वनमंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला.पूजाच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिप्समुळे संजय राठोड कमालीचे अडचणीत आले होते. सर्व बाजूंनी घेरले गेलेले राठोड हे रविवारी दुपारी सपत्नीक वर्षा बंगल्यावर गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. अशा प्रकारे राजीनामा द्यावा लागलेले राठोड हे पहिलेच मंत्री आहेत.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून राज्यात गलिच्छ राजकारण सुरु असल्याचा पलटवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. राजीनामा घेणं, गुन्हा दाखल करुन मोकळे होणं म्हणजे न्याय देणं नव्हे. या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणाने व्हावा ही भूमिका आमची आहे. जे तपासातून समोर येईल त्यानुसार कारवाई होईल, असं आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलंय.

दरम्यान, सध्या संजय राठोड यांच्याकडे असलेल्या मंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवली आहे. मात्र आता विदर्भातून आमदार डॉ. संजय रायमूलकर व आशिष जयस्वाल यांच्या नावाची चर्चा आता मंत्रिपदासाठी सुरू झाली आहे.तीन टर्मपासून आमदार असलेले डॉ. रायमूलकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. २००९, २०१४ व २०१९ अशा तीन निवडणुकीत सलग चढत्या मताधिक्‍याने विजयी होण्याचा विक्रम रायमूलकर यांच्या नावावर आहे.

संजय रायमुलकर यांच्याशिवाय शिवसेनेचे माजीमंत्री रवींद्र वायकर आणि गोपी किशन बजोरिया यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. त्यापैकी रवींद्र वायकर हे उपनगरातील शिवसेनेचे खंदे समर्थक मानले जातात. गोपीकिशन बाजोरियादेखील शिवसेनेचा आक्रमक चेहरा मानला जातो. यामुळे या आमदारांपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे येत्या काही दिवसात समोर येईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!