मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. शेतकरी, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, संजय राठोड यासारख्या अनेक मुद्द्यांनी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. विरोधकांचे मुद्दे त्यांनी शांतपणे मांडावेत, गोंधळ करु नये. विरोधकांनी मांडलेल्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा होईल, गोंधळाने काहीही साध्य होणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी घेतली आहे.
‘अक्कड बक्कड बंबे बो, 80, 90 पुरे 100’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असे फलक हातात घेऊन काँग्रेसने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. काँग्रेसच्या सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी आज सायकलवरून प्रवास करत विधान भवन गाठले. यावेळी काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हे सायकल आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि नेते आज सकाळी मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जमला. यावेळी त्यांच्या हातात इंधन दरवाढीचे निषेध नोंदवणारे फलक होते. त्यावर, ‘अक्कड बक्कड बंबे बो, 80, 90 पुरे 100’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असा मजकूर लिहिलेला होता. यावेळी काँग्रेस नेत्यांनी महात्मा गांधींना अभिवादन केल्यानंतर सायकलवरून विधानभवनाच्या दिशेने प्रवास सुरू केला. यावेळी नाना पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार प्रणिती शिंदे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे सर्वच आमदार उपस्थित होते.
कॉंग्रेसच्या या आंदोलनावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. देशातील सर्वाधिक पेट्रोलचे भाव असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. केंद्र सरकारचा एकूण टॅक्स 32 रुपये आहे. राज्य सरकारनं 27 रुपये टॅक्स पेट्रोलवर लावला आहे. नाना पटोलेंचे आंदोलन राज्य सरकारविरोधात असावं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. तर, काँग्रेसला विरोधी पक्षांची जागा घेता येणार नाही. देशात काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे, अशा अवस्थेत मीडिया इवेंट ते करत आहेत. असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पालकमंत्र्यानी आतातरी जागे व्हावे! भाजप महिला आघाडीचा सवाल
- सर्जरीनंतर अभिताभ बच्चन यांनी ट्वीट करून मानले चाहत्यांचे आभारआपलं; आयुष्यासंबंधी दिला बहुमोल संदेश
- ‘कॅाग्रेसची अवस्था दयनीय झाली हे मात्र खरं’, सायकल आंदोलनावरून भाजपचा घणाघात
- शिवजयंतीसाठी लागू होणारे कोरोनाचे नियम पब,नाईट लाईफसाठी लागू होत नाहीत का ?
- महाराष्ट्राला 29 हजार कोटींचा GST परतावा केंद्राकडून येणं बाकी – राज्यपाल


