Share

‘…तेव्हा पोलिसांच्या जीवावर राज्य करण्याची वेळ येते’; राणेंच्या अटकेनंतर भाजप नेत्याचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप आमने-सामने आले आहेत. नाशिक पाठोपाठ पुण्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील पोलिसांचे पथक रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी त्यांना संगमेश्वरमध्ये येथून ताब्यात घेतलं आहे.

नारायण राणेंच्या अटकेनंतर आता भाजपने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘जनतेचा पाठिंबा आणि विश्वास नसेल तर पोलिसांच्या जीवावर राज्य करण्याची वेळ येते. हे फार काळ चालत नाही, ठाकरे सरकार…’ असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

प्रमोद जठार यांचा पोलिसांसह सरकारवर गंभीर आरोप –

‘स्थानिक एसपी राणेंना अटक करण्यासाठी आले असता आम्ही त्यांना वॉरंट दाखवण्याची मागणी केली. मात्र त्यांनी ते न दाखवता आमच्यावर दबाव आहे असं सांगितलं. राणे हे केंद्रीय मंत्री असल्याने प्रोटोकॉल नुसार न्यायालयाची परवानगी असणे गरजेची आहे. मात्र वॉरंट न दाखवताच आमच्यावर दबाव असून कारवाई करण्याचे आदेश असल्याचं म्हटलं,’ असा दावा प्रमोद जठार यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!