Share

पोलिसांवर दबाव, ते राणेंना अटक करायला वॉरंट विनाच पोहोचले; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप आमने-सामने आले आहेत. शिवसेनेचे नाशिकमधील शहाराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता या वादाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहे. अनेक ठिकाणी शिवसेना-भाजप आमने-सामने आले असून पोलिसांनी समजूत काढल्यानंतरही कार्यकर्त्यांनी न ऐकल्याने विविध शहरांमध्ये पोलिसांना लाठीचार्ज करावा लागत आहे. दरम्यान, नाशिक आणि पुणे पोलिसांचे पथक हे रत्नागिरीत दाखल होणार असतानाच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक हे नारायण राणे यांना अटक करायला पोहोचले आहेत.

यामुळे तणाव अधिक वाढला असून पोलिसांचा अधिक बंदोबस्त वाढवला जात आहे. दरम्यान, भाजप नेते प्रमोद जठार यांनी माध्यमांसमोर येत खळबळजनक दावा केला आहे. ‘स्थानिक एसपी राणेंना अटक करण्यासाठी आले असता आम्ही त्यांना वॉरंट दाखवण्याची मागणी केली. मात्र त्यांनी ते न दाखवता आमच्यावर दबाव आहे असं सांगितलं. राणे हे केंद्रीय मंत्री असल्याने प्रोटोकॉल नुसार न्यायालयाची परवानगी असणे गरजेची आहे. मात्र वॉरंट न दाखवताच आमच्यावर दबाव असून कारवाई करण्याचे आदेश असल्याचं म्हटलं,’ असा दावा प्रमोद जठार यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, जठार यांनी राणे यांची तब्येत खालावली असल्याची देखील माहिती दिली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर राणे आपल्या वाहनातून पोलिसांसोबत बाहेर पडले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी गाडी अडवण्याचा देखील प्रयत्न केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!