🕒 1 min read
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता.
हे सर्व सुरु असताना शिवसेना-राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे छातीठोकपणे सांगत आहेत.
आज अमरावतीमध्ये बोलताना त्यांनी परत एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नाना पटोले म्हणाले, ‘आम्ही आधीपासूनच आगामी निवडणुकांबद्दलचं आमचं धोरण जाहीर केलं आहे. समजा आम्ही सोबत आहोत असं म्हटलं आणि ऐन निवडणुकांच्या वेळी स्वतंत्र लढणार असं सांगितलं, तर ते पाठित खंजीर खुपसल्यासारखं होईल. त्यामुळे आजपासूनच आम्ही म्हणतोय, आम्ही स्वतंत्रच लढणार’.
मित्रपक्षांकडून नाना पटोलेंची खिल्ली
पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याची भाजपकडून नेहमीच खिल्ली उडवली जाते. पण आता पटोले यांच्या या दाव्याची चक्क राष्ट्रवादीचे नेते देखील खिल्ली उडवू लागले आहेत. राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी एक ट्वीट करून पटोले यांची चांगलीच टर उडवली आहे. चव्हाण यांनी एक विनोद ट्वीट केला आहे. पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर इतर काँगेस नेते (खाजगीत) नया है वह असे म्हणतात असे सांगणारा एक विनोद पोस्ट केला आहे. एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची जर सहकारी पक्ष अशा पद्धतीने जाहीररीत्या खिल्ली यातच सर्वकाही आलं. याशिवाय कॉंग्रेसला त्यांचे सहकारी पक्ष किती गांभीर्याने घेतात हे देखील यावरून दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘बेईमानी झाकण्यासाठी गुलाम या शब्दाचा वापर’, सुधीर मुनगंटीवारांचे राऊतांना प्रत्युत्तर
- ‘कितीही रणनिती आखू द्या, २०२४ ला मोदीच येणार!’, फडणवीसांचा दावा
- ‘भाजपसोबत असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली’, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
- ‘यांचे म्हणजे… नाचता येईना अंगण वाकडं!’, प्रविण दरेकरांचा शिवसेनेला टोला
- ‘चला, राऊतांनी हे मान्य तर केलं की त्यांचा वाघ पिंजऱ्यात आहे!’, चंद्रकांत पाटलांचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
