🕒 1 min read
मुंबई : संजय राऊत यांनी जळगाव येथे शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना भाजपवर हल्लाबोल केला होता. ‘राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण गेल्या पाच वर्षात शिवसेना संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. शिवसेना सत्तेत असतानाही गावोगावी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला गेला. पाच वर्षे सत्तेत होतो. पण सत्तेत असूनही गुलाम होतो. गुलामासारखी वागणूक मिळत होती.’ असे वक्तव्य राऊत यांनी केल्याने राजकीय खळबळ उडाली होती.
यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केलाय. ‘खरं तर आपली बेईमानी झाकण्यासाठी गुलाम या शब्दाचा वापर केला जात असल्याचा पलटवार मुनगंटीवार यांनी केलाय. पाच वर्षे खिशात असलेले राजीनामे, त्या खिशाला काय चैन होती, चैनला काय मोठं कुलूप होतं? असा सवाल त्यांनी केलाय.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
खरं तर आपण केलेल्या बेईमानीला झाकण्यासाठी या शब्दाचा वापर केला जातोय. गुलामाचा स्वाभिमान जागण्यासाठी पाच वर्षे जावी लागली? गुलामासारखी वागणूक दिली तर हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार खुर्चीसाठी गुलामी करतील? हे ऐकलं की अंगावर काटा येतो. पाच वर्षे खिशात असलेले राजीनामे, त्या खिशाला काय चैन होती, चैनला काय मोठं कुलूप होतं?
जर तुम्हाला गुलामगिरीची वागणूक दिली गेली होती, तर एका सेकंदात ते राजीनामे तोंडावर फेकून मारायचे. राजकारणात कुणी गुलाम नाही कुणी राजा नाही. मंत्रालयात सातव्या मजल्यावर जिथे आमची बैठक व्हायची, तिथे मुख्यमंत्र्यांसह सर्वांना समान वजनाच्या, समान रंगाच्या, समान आकाराच्या खुर्च्या होत्या. मुख्यमंत्र्यांना जी खुर्ची होती तशीच खुर्ची एकनाथराव शिंदेंनाही होती. त्यामुळे गुलामगिरीची भाषा योग्य नाही. अशा शब्दात मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कितीही रणनिती आखू द्या, २०२४ ला मोदीच येणार!’, फडणवीसांचा दावा
- ‘भाजपसोबत असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली’, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
- ‘यांचे म्हणजे… नाचता येईना अंगण वाकडं!’, प्रविण दरेकरांचा शिवसेनेला टोला
- ‘चला, राऊतांनी हे मान्य तर केलं की त्यांचा वाघ पिंजऱ्यात आहे!’, चंद्रकांत पाटलांचा पलटवार
- ‘केंद्रात काहीही होवो, युपीत भाजपचे सरकार जाणार हे निश्चित’, राष्ट्रवादीचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
