🕒 1 min read
सोलापूर : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काहीसा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये घट होत असून कोरोना मुक्तांचा आकडा हा अधिक आहे. मात्र, अद्यापही राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या हि तीन लाखांपार असून दररोज रुग्णांमध्ये होणारी वाढ ही देखील आटोक्याबाहेर आहे. अशातच, तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला असून लहान वयोगटातील मुला-मुलींना अधिक धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आता राज्यातील निर्बंध पुन्हा १ जूननंतर वाढणार की काही दिलासा मिळणार याकडं राज्यातील जनतेचं लक्ष्य लागलं आहे. याबाबत राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आता महत्वाचं विधान केलं आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात आणि जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे चित्र समोर येत आहे. याच दरम्यान लसीकरण मोहीमही सर्व स्तरापर्यंत जाऊन करून घेतली जात आहे. याशिवाय तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्याकरता प्रयत्न केले जात आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करून पुढील काळामध्ये राज्यात आणि जिल्ह्यातील करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला तर एक जूननंतर लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाकडून घेतला जाऊ शकतो अशी शक्यता दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- बारावीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय होणार ? केंद्र सरकारची महत्वाची बैठक
- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणार ‘उभारी’!
- एखाद्या माणसाच्या भावनांची चेष्टा करणे योग्य नाही; चंद्रकांत पाटलांच विरोधकांना प्रत्युत्तर
- ‘एकनाथ शिंदेंनी चांगलं काम केलं, पण उद्धव ठाकरे मात्र कपड्याची इस्त्रीही मोडू न देता मुंबईत परतले’
- औरंगाबादेत तरुण वर्गच सुपर स्प्रेडर, बाधितांमध्ये ‘एवढ्या’ तरुणांचा समावेश!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

