Share

…तर अजित पवारांविरोधात स्वतः तक्रार करेन ; पुण्यातील ‘त्या’ प्रकरणावरून सुळेंचं वक्तव्य

Published On: 

पुणे : पुण्यातील आंबिल ओढा परिसरात दि. २४ जून रोजी सकाळी अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरु करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले होते. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला होता. तसेच यावेळी आंदोलन करत स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तर, शेकडो कुटुंब ऐन पावसाळ्यात उघड्यावर पडली आहेत.

अखेर स्थानिकांच्या आक्रोशानंतर आणि पोलीस-स्थानिक यांच्या संघर्षानंतर न्यायालयाने या तोडकामास पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. तर, ऐन पावसाळ्यात घाईने करण्यात आलेल्या या कारवाईवर सर्वच पक्षीय नेत्यांनी नाराजी वर्तवली असतानाच ही कारवाई नेमकी कोणाच्या सांगण्यावरून झाली याबाबत अनेक चर्चा शहरात सुरु आहेत. पुण्यातील आंबिल ओढा प्रकरणातील विकासक उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा निकटवर्तीय असल्याचा अप्रत्यक्ष आरोप विरोधकांकडून केला गेला.

दरम्यान आज पुणे महापालिकेसमोर दोन आंदोलन करण्यात येत होती. एकीकडे कचरावेचक आंदोलन करत असतानाच दुसऱ्या बाजूला आंबिल ओढयातील नागरिकांनी देखील इथेच आंदोलन सुरू केलं. त्यावेळी कचरावेचकांची भेट घेऊन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आंबिल ओढ्यातील नागरिकांचा भेटीला गेल्या. यावेळी आक्रमक झालेल्या नागरिकांनी सुळे यांचा समोरच अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली. आमची घरं अजित पवारांनी पाडली तुम्ही इथे का आलात असा सवाल आंदोलकांनी विचारला.

यावेळी ‘अजित पवारांचा विरोधात पुरावे द्या खरं असेल तर मी स्वतः तक्रार करेन’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी आंबिल ओढा प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान यावेळी आंदोलकांवर कारवाई का करण्यात आली? असा प्रश्न विचारून आंदोलकांनी पुन्हा घरं बांधून देण्याची मागणी केली. त्याचबरोबर घरं पाडल्याबद्दल अजित पवार मुर्दाबाद, पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी घोषणाबाजी या स्थानिकांकडून करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!