औरंंगाबाद : रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सहा आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. तर सातवा आरोपी साईनाथ अण्णा वाहुळ (वय ३२, रा. रामनगर) याने सादर केलेला नियमीत जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी शुक्रवारी (दि.७) फेटाळला.
रेमडीसीवीर इंजेकशनचा काळा बाजार करणारे रॅकेट गुन्हे शाखेने २६ एप्रिल रोजी उघडकीस आणले होते. प्रकरणात दिनेश कान्हु नवगीरे, रवि रोहिदास डोंगरे, संदीप सुखदेव रगडे, प्रविण शिवनाथ बोर्डे , नरेंद्र मुरलीधर साबळे आणि अफरोज खान इकबाल खान, साईनाथ अण्णा वाहुळ यांच्याविरूध्द विरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सात पैकी सहा आरोपींना न्यायालयाने १ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. तर सातवा आरोपी साईनाथ वाहूळ याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. दरम्यान उर्वरित सहा आरोपींची कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पोलीसांची मागणी फेटाळून आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
त्यानंतर दिनेश कान्हु नवगीरे, रवि रोहिदास डोंगरे, संदीप सुखदेव रगडे, प्रविण शिवनाथ बोर्डे , नरेंद्र मुरलीधर साबळे आणि अफरोज खान इकबाल खान या सहा आरोपींनी नियमीत जामीनीसाठी अर्ज सादर केला असता न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. तर आरोपी साईनाथ वाहुळ याने नुकताच नियमीत जमानीसाठी अर्ज सादर केला असता, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर केला. प्रकरणात सहायक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी काम पाहिले.
महत्त्वाच्या बातम्या
- आयपीएल स्थगितीनंतर सकारिया गेला रुग्णालयात ; घेतली कोरोनाग्रस्त बापाची भेट, म्हणाला…
- लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा;उदयनराजे आक्रमक
- ‘मराठा आरक्षण फडणवीसांनी दिले; एकही मराठा मुख्यमंत्री मराठा आरक्षण देऊ शकला नाही’
- आयपीएल -14 चे उर्वरित सामने कधी आणि कोठे होतील? ‘हे’ आहेत पर्याय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

