🕒 1 min read
मुंबई : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण निर्माण झाला आहे. दरम्यान, फ्रंट लाईन वर्कर्सना असलेला धोका ओळखून प्राधान्याने लसीकरण करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात राज्यभरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनादेखील कोविड योद्धे समजून लसीकरणात प्राधान्य द्यावे, अशी विनंती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
परब म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध कामामध्ये एसटी कर्मचारी आत्तापर्यंत अग्रेसर राहिले आहेत.एसटी कर्मचाऱ्यांना अनेकदा आपल्या कुटुंबापासून लांब जावे लागते, रहावे लागते. प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांशी त्यांचा संपर्क येतो. तसेच शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची चाचणी करणे आवश्यक केले आहे. या सगळ्याचा विचार करता, संबंधित एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन त्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.
एसटी महामंडळात सध्या सुमारे ९८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, बँक कर्मचारी अशा अनेक अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित प्रवासी सेवा देण्याचे काम एसटीचे कर्मचारी अव्याहतपणे करीत आहे.
दरम्यान, गेल्या वर्षभरात अनेक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला असून आता राज्यातील पत्रकारांचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांनी यापूर्वीच पत्रकारांच्या लसीकरणाबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांचे देखील लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे अशी मागणी थोरात यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दारू पिऊन तर्रर्र! मनपा कर्मचाऱ्यांच्या मनमानीला कंटाळून व्यापाऱ्यांनी बदडले
- लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा;उदयनराजे आक्रमक
- ‘मराठा आरक्षण फडणवीसांनी दिले; एकही मराठा मुख्यमंत्री मराठा आरक्षण देऊ शकला नाही’
- आयपीएल -14 चे उर्वरित सामने कधी आणि कोठे होतील? ‘हे’ आहेत पर्याय
- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन आरोग्य विभागाने सतर्क रहावे – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
