Share

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ सज्ज ; जाडेजा, विहारीचे भारतीय संघात कमबॅक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. या दोन्ही मालिकेसाठीच्या टीम इंडियाची काल (शुक्रवारी) निवड करण्यात आली.

जून महिन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२१ चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

रवींद्र जाडेजा व हनुमा विहारी या दोघांचे टीम इंडियाच्या कसोटी संघात पुनरागमन झाले असून हार्दिक पांडय़ा व कुलदीप यादव या दोघांनाही या संघात स्थान देण्यात आलेले नाही .

जगभरात सध्या कोरोनाची लाट सुरू आहे. त्यामुळे भारताकडून आगामी प्रदीर्घ दौऱ्यात 24 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 20 खेळाडूंना अंतिम चमूत स्थान देण्यात आले असून चार खेळाडू स्टॅण्डबाय म्हणून ठेवण्यात आले आहेत. यामध्ये अभिमन्यू इस्वरन, प्रसिध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवासवाला या खेळाडूंचा समावेश आहे.

भारतीय संघ :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!