पुणे : आमदार माधुरी मिसाळ यांच्या रहात्या घरातून 18 लाखाच्या दागिण्यांची चोरी झाली. याप्रकरणी ममता दिपक मिसाळ यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लग्नात घालण्यासाठी काढलेले दागिने बेडरुमच्या तिजोरीवर ठेवले असता चोरण्यात आले असल्याचं सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी ममता दीपक मिसाळ (वय ५१, रा. फेअर रोड, वानवडी) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, आमदार माधुरी मिसाळ व आम्ही सर्व जण एकत्र राहतो. बंगल्यामध्ये काम करण्यासाठी आम्ही नोकर ठेवलेले असून त्यापैकी बंगल्यामधील साफसफाई, धुणीभांडी व इतर काम करण्यासाठी ७ महिला नोकर आहेत. त्यांच्यापैकी बंगल्यामध्ये असणारे सर्व बेडरुमची साफसफाई करण्यासाठी ठेवलेल्या नोकरी महिला या काम करण्यासाठी बेडरुममध्ये येत असतात.
२८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता माझ्या बेडरुममध्ये ठेवलेले सोन्याचे दागिन्यांपैकी एक हिरे, मोतीची डिझाईन असलेला एक सोन्याचा हार व सोन्याचे हिरे माेतीची डिझाईन असलेला कडा तिजोरीत ठेवलेला बॉक्स मिळून आला नाही. हा प्रकार त्यांनी पती दीपक यांना सांगितला. त्यानंतर माधुरी मिसाळ यांनाही सांगितले.
सर्वांनी सोन्याचे दागिने ठेवलेला बॉक्स शोधला. परंतु, तो मिळून आला नाही. १८ ते २८ नोव्हेंबर या दरम्यान १४ लाख रुपयांचा हिऱ्यांचा हार आणि ४ लाख रुपयांचा हिरे मोती असलेला हार असा १८ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला असल्याची फिर्याद देण्यात आली आहे.विशेष म्हणजे या घटनेलाही पंधरा दिवस झाले असतानाही तपासात कुठलिही प्रगती झालेली नाही.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांचा अवमान करणारे रावसाहेब दानवे हे येडपट आणि भैताड आहेत : वडेट्टीवार
- शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्या दानवेंचा फोटो असलेला बॅनर पायदळी तुडवला
- सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गरजूला वेळेत घरकुल मिळेल यासाठी नियोजन करा : भरणे
- ‘कोरोनोत्तर काळात राज्यात पर्यटन विकास आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना देणार’
- शरद पवारांना पंतप्रधानपदापर्यंत पोहचू न देण्यात काँग्रेसचा मोठा हातभार आहे : शिवसेना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
