बीड : दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन नसून या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त विधान भाजपचे नेते आणि केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. हे आंदोलन बाहेरच्या देशाचे षडयंत्र असून आपल्या देशातील लोकांनी याचा विचार केला पाहिजे, असेही दानवे म्हणाले.
आंदोलन करणारे लोक हे सुटाबुटातील लोक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे कोणाच्या भूल थापांना बळी पडू नका, असे आवाहन देखील दानवे यांनी केले आहे. या वक्तव्यांमुळे दानवे यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
दरम्यान, बीडमध्ये आंदोलन करत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या विधानाचा शिवसैनिकांनी समाचार घेत आपला संताप व्यक्त केला. यावेळी दानवेंचा फोटो असलेला बॅनर पायदळी तुडवत जाळण्यात आला केज, धारूर, अंबाजोगाई, परळी, माजलगावमध्ये जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांचा अवमान करणारे रावसाहेब दानवे हे येडपट आणि भैताड आहेत : वडेट्टीवार
- राहुल गांधींविरोधात रचलं जातंय मोठं षडयंत्र? जाणून घ्या नेमका काय आहे प्रकरण …
- सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गरजूला वेळेत घरकुल मिळेल यासाठी नियोजन करा : भरणे
- ‘कोरोनोत्तर काळात राज्यात पर्यटन विकास आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना देणार’
- ‘ठाकरे सरकार आल्या आल्या नाईट क्लबवाले त्यांच्या बापाचं सरकार असल्यासारखे वागू लागलेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

